आपला जिल्हा

संगमेश्वर तालुक्यातील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा सुरळीत सुरु न झाल्यास शिवसेनेचा ( उबाठा ) आंदोलन छेडण्याचा इशारा.

देवरुख - सुरेश सप्रे

देवरूख येथील कनिष्ठ अभियंता, दूर संचार निगम लि.,यांचे अधिपत्याखालची दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा कोलमडली सून ती सुरळीत सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका उबाठाशिवसेनेचे वतीने सौ. नेहा माने. महिला संपर्क संघटक – रत्नागिरी सिंधुदुर्ग यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे

देवरुख शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये आपल्या दूरसंचार निगमचे (BSNL) असंख्य ग्राहक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दुरध्वनी व भ्रमणध्वनी या आपण देत असलेल्या सेवा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची प्रचंड गैरसोय होवून मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता आपली सेवा अखंडीतपणे सुरु असणे आवश्यक आहे.

दिनांक २ जानेवारी २०२४ पर्यंत आपली दूरसंचार सेवा सुरळीपणे कार्यान्वित न झाल्यास आपल्या ढिसाळ कारभाराबाबत शिवसेना व युवासेनेच्या वतीने दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी आंदोलन छेडून आपल्या तालुक्यातील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

सदरच्या नामुष्की वा होणाऱ्या हानीस आपणच जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी असे नमुद केले आहे.

या निवेदनावर सौ नेहा रवींद्र माने संपर्क संघटक, लोकसभा रत्नागिरी -सिंधुदुर्ग. सौ. वेदा फडके जिल्हा संघटक, रत्नागिरी नंददिप (बंड्या ) बोरुकर सौ. स्मिता लाड तालुका प्रमुख, संगमेश्वर. रोहन बने माजी जि. प. सदस्य. श्री तेजस शिंदे तालुका संघटक युवासेना तालुका प्रमुख, प्रद्युम्न माने युवासेना सहसचिव, महाराष्ट्र प्रदेश. दादा शिंदे सौ निलम हेगशेट्ये यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..

Related Articles

Leave a Reply

Back to top button