येडगेवाडी मुंबईकर मंडळाने नळपाणी योजनेसंदर्भात घेतली आमदार शेखर निकम यांची भेट ; येडगेवाडीसाठी १ कोटी ३७ लाखांची नळपाणी योजना मंजूर

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी साधारण एक हजार लोकवस्तीची वाडी असून या ठिकाणी फक्त येडगे आडनावांचे ३०० पेक्षा अधिक मतदार आहेत. या वाडीचा विकास व्हावा म्हणून गावाकडील कार्यकर्त्यांसह मुंबईकर मंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो. गावाकडील कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधत मुंबईकर मंडळी नेहमी विकास कामांबाबत चर्चा करत असते या पार्श्वभूमीवर मुंबईकर मंडळाने दि.१८ अॅाक्टोबर रोजी आमदार शेखर निकम यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेत येडगेवाडीसाठी प्रस्तावीत असलेल्या नळपाणी योजने विषयी चर्चा केली आणि काम सुरु करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांसह ठेकेदार यांना सूचना देणाची विनंती केली.
कुटगिरी येडगेवाडी ही सह्याद्री पर्वत रागांच्या डोंगरमाथ्यावर वयलेली एक मोठ्या लोकसंख्येची वाडी आहे. या नजीकच्या काळात या ठिकाणी रस्ता, वीज या सारखी कामे झाली आहेत मात्र पाणी प्रश्न गंभीर असल्याने येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत येडगेवाडीला नळपाणी पुरवठा योजना व्हावी म्हणून आमदार शेखर निकम यांनी वेळोवेळी सहकार्य केले तर माजी उपसरपंच संतोष येडगे, तुकाराम येडगे यांनी या योजनेचे अंदाजपत्रक बनवण्यापासून मंजुरीपर्यंत पाठपुरावा करत या योजनेला तब्बल १ कोटी ३७ लांखांचा निधी मंजूर करुन घेतला आता ही योजना मार्गी लागावी म्हणून गावातील कार्यकर्त्यांसह मुंबईकर मंडळाने कंबर कसली असूम त्याच पार्शबूमीवर आमदार शेखर निकम यांची भेट घेवून काम सुरु करण्याबाबत चर्चा केली यावेळी मुंबईकर मंडळातील सुरेशशेठ येडगे, जनार्दन बुवा येडगे, पांडूरंग बाबू येडगे, रामचंद्र येडगे, पांडूरंग येडगे ( Air India ), राजिवली ग्रामपंचायत सदस्य रमेश येडगे, पांडूरंग विठ्ठल येडगे, धोंडीबा जानू येडगे आदी मुंबईकर उपस्थित होते.



