आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

सती चिंचघरी प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न

चिपळूण - योगेश बंडागळे

चिपळूण – सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षिका श्रीम. ज्योती चाळके यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी व सौ. माधुरी खताळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी अतिशय मोलाची माहिती आपल्या मनोगतातून दिली. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. लहान गटात प्रथम कु. शंभुराज प्रवीण भोसले, व्दितीय कु. शौर्य दिपक पोटे, तृतीय कु. जान्हवी प्रदिपकुमार यादव, उत्तेजनार्थ कु. स्वानंदी अपूर्व शिर्के तर मोठया गटात प्रथम कु. वेदांत महेंद्र महाडीक, व्दितीय कु. समिक्षा दिपक पोठे, तृतीय कु. मृणाली दत्ताराम शिगवण, उत्तेजनार्थ कु.भार्गवी सचिन कदम यांनी प्राविण्य प्राप्त केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण श्री. संदेश सावंत व सौ. रश्मी राजेशिर्के यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन सौ. विनया नटे यांनी केले.

कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका सौ.मनिषा कांबळी, सौ. रश्मी राजेशिर्के, श्री. संदेश सावंत, सौ. अपूर्वा शिंदे, सौ. विनया नटे, श्रीम. वृषाली राणे, श्रीम. अर्चना देशमुख, सौ.रूपाली खरात,श्रीम.ज्योती चाळके, श्रीम. वर्षा सकपाळ, सौ. शितल पाटील, सौ. माधुरी खताळ, सौ. स्वरा भुरण यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button