अपघातआपला जिल्हा
येडगेवाडी – माखजन गाडीला अपघात ; जीवितहानी नाही

संगमेश्वर तालुक्यातील माखजन – येडगेवाडी मार्गावरील नियमित सुरु असणा-या एस.टी बस ला आज दि.३ अॅागस्ट रोजी येडगेवाडीतून आरवलीच्या दिशेने परतत असताना दुपारी १२.३० च्या सुमारास कुंभारखानी बु! या ठिकाणी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. एस.टी बस रस्त्यावरुन गटारात कलंडली सुदैवाने प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असली तरी सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

आरवली – येडगेवाडी मार्गावरील रस्ता हा एकेरी असल्याने या मार्गावर गाडी चालवताना एस.टी बस चालकाने खबरदारी घेणे आवश्यक असते मात्र देवरुख आगाराचे चालक दुपारच्या फे-या चालताना वेगात असतात त्यामुळे असे अपघात वारंवार होत आहेत या मार्गावरील बस चालकांना देवरुख आगारप्रमुखांनी गाडीच्या वेगाबाबत वेळीच सूचना दिली तर आगामी काळातील अपघात टळण्यास मदत होणार आहे.



