आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांना खेर्डीतील महीलांनी दिल्या शुभेच्छा

चिपळूण – राज्यात २ जुलै २०२३ रोजी सत्तापरीवर्तन झाले आणि राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले. राष्ट्रवादी पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासमवेत अनेक आमदार सत्तेत सामील झाले तर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खालदार सुनिल तटकरे हे अजितदादांसोबत सत्तेत सामील झाले त्यांचेयसोबत चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी ही अजितदादांचा साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला त्याच्यासोबच चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आमदार शेखर निकम यांच्यासोबत राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) सामील झाले खेर्डीतील दाभोळकर कुटुंबाने ही अजित पवार यांना साथ देत सत्ता परीवर्तनात सामील झाल्याने माजी जिल्हा परीषद सदस्या दिशा दाभोळकर यांना बढती देत त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिशा दाभोळकर यांच्या निवडीमुळे चिपळूण शहर व खेर्डी परीसरात जल्लोषाचे वातावरण असून खेर्डीतील महीलांनी आज १ अॅागस्ट रोजी दिशा दाभोळकर यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या दिशा दाभोळकर यांना सर्वच पक्षातील महीला पदाधिका-यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button