आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आयडॉलच्या प्रवेशास १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत होती. ही प्रवेशाची मुदत १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.आजपर्यंत या सत्रात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात १२ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र , एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू आहेत.

पदवीस्तरावरील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण

आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

अभ्यासक्रम निहाय आजपर्यंत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

अ. क्र. अभ्यासक्रम विद्यार्थी संख्या

१. प्रथम वर्ष बीए : २७७१
२. प्रथम वर्ष बी. कॉम : ३६४४
३. प्रथम वर्ष बीकॉम अकाउंट्स अँन्ड
फायनान्स : २३२
४. प्रथम वर्ष बीएस्सी आयटी व
कॉम्प्युटर सायन्स : ३७०
४. प्रथम वर्ष एमए : १६०२
५. प्रथम वर्ष एमकॉम : २४६०
६. प्रथम वर्ष एमएस्सी : ४१२

Related Articles

Leave a Reply

Back to top button