गणपती उत्सवात ग्राहकांना विज भरणा मध्ये मुदत मिळणेबाबत चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

चिपळूण – संपूर्ण कोकणामध्ये गणेशोत्सव हा उत्सव अतिशय आनंदाने व उत्सवाने साजरा केला जातो.सध्याच्या महागाईच्या जगात गोर,गरिबांना महागाईने ग्रासलेले आहे.विजेचे बिल भरणा करणे आणि गणपती सारखा मोठा सण आल्याने नागरिकांची आर्थिक गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे.गणपती उत्सवाच्या गडबडीमध्ये काही नागरिकांचे विज बिल थकीत राहू शकते या सर्व बाबींचा विचार करता गणपतीच्या सणामध्ये तालुक्यातील नागरिकांना बिल भरणेसाठी सवलत मिळावी व विज वाहिनी तोडण्यात येवू नये अशा प्रकारचे निवेदन चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरचे कार्यकारी अभियंता मा.श्री.लवेकर साहेब यांजकडे देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे,शहर अध्यक्ष मिलिंद कापडी,माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी,प्रदेश युवक सरचिटणीस डॉक्टर राकेश चाळके,युवक अध्यक्ष निलेश कदम,खेर्डी ग्रामपंचायत माजी सरपंच दशरथ दाभोलकर,मनोज जाधव,सचिन पाटेकर,रियाज खेरटकर,सचिन गमरे,गणेश भुरण,सचिन शिंदे,तन्वीर खेरटकर आदी उपस्थित होते..



