आकले येथे ‘माझा गाव माझी जबाबदारी मिशन आपुलकी’ कार्यक्रम उत्साहात

चिपळूण – तालुक्यातील आकले येथे ‘माझा गाव माझी जबाबदारी मिशन आपुलकी’ कार्यक्रम समाजसेवक विनेश मोहिते. सामाजिक विकास ग्रुप यांच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सौ.पूजा निकम उपस्थित होत्या. सौ. निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आकलेच्या सरपंच सौ.सोनाली कदम, माजी सरपंच सौ.विशा मोहिते, ग्रामसेवक धनराज सर्वदे स्वप्निल शिंदे, राजाराम देवरे, निलेश कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सौ.पूजा निकम यांचा सत्कार करण्यात आला. अनेक उपस्थित मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले. पूजा निकम. यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस, सौ. पूजा निकम अनेकांनी सामाजिक विकास ग्रुपचे, समाजसेवक विनेश मोहिते यांचे ते मुंबईत राहून नोकरी करून आपल्या गावासाठी त्याचबरोबर बाजूच्या अंगणवाड्यांनासुद्धा मदत करत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. अंगणवाडी केंद्र आकले चोरगेवाडी, अंगणवाडी केंद्र आकले गुरववाडी, बौद्धवादी, अंगणवाडी केंद्र गजमलवाडी, अंगणवाडी केंद्र कादवड तांबडवाडी, अंगणवाडी केंद्र कादवड देऊळवाडी या पाच अंगणवाडी केंद्रांना नुकतेच साहित्य वाटप करण्यात करण्यात आले. १० महापुरूषांचे फोटो, २ चटई, १ कुकर, ६ फुलकुंड्या, १ आरसा, ५०० लिटर, ७५० लिटर पाण्याची टाकी या वस्तू भेटस्वरूपात देण्यात आल्या. तरी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांनी मिशन आपुलकी कार्यक्रमाला उपस्थित राहून विनेश मोहिते यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका श्रेया पवार, मयुरी कडव, कांचनी शिंदे, साक्षी शिगवण, अर्चना जाधव, दिनेश शिंदे, विद्या मोहिते, शोभा मोहिते, रेश्मा शिंदे, माजी सैनिक संभाजी चव्हाण, माजी पोलीस पाटील सतीश शिंदे, महेश शिंदे, सुधीर मोरे, सिद्धेश शेट्ये, मधुकर मोहिते, पूजा चव्हाण आदी उपस्थित होते. या मिशन आपुलकीचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.



