आपला जिल्हा
कामगार कल्याण गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धा मालवण प्रथम पोफळी द्वितीय

शिरगाव – पोफळी येथील सांस्कृतिक भवनात काल ता २७रोजी झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत मालवण संघाने प्रथम पोफळी द्वितीय,कुडाळ तृतीय क्रमांक पटकावला.प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक खेर्डी वसाहत,द्वितीय महाड संघाला देण्यात आले. अकरा संघांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी महानिर्मिती अधीक्षक अभियंता अजय शिंदे यांनी जीवनात जोपासलेली कला आपणास वेगळी ऊर्जा देत असते.जीवनात कोणतातरी छंद जोपासला पाहिजे असे मत मांडले.त्यांच्या समवेत कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड,वर्कर्स फेडरेशन चे प्रवीण ताथवडे,विजय कदम, प्रमोद बोडरे,परीक्षक रुपेश धाडवे,प्रथमेश पिंपलकर अक्षया कांबळी उपस्थित होते.संतोष नेवरेकर,संगीता सुवार,स्नेहा चव्हाण यांनी संयोजन सहकार्य केले.



