आपला जिल्हा

भाजपा पदाधिकाऱ्यांची आंगवली बौद्ध विहारास भेट; बौद्ध समाज बांधवांशी चर्चा व स्नेहभोजन संपन्न ; आंगवली येथील बौद्ध बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

देवरूख- भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान सुरू आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील आंगवली येथे आज मंगळवारी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा आंगवली येथील बौद्ध विहारास सदिच्छा भेट दिली. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव आदी मान्यवरांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदन केले. यानंतर श्री. प्रदीप मोहिते यांनी उपस्थित सर्वांसहित बुद्धवंदना पठण करून वातावरण मंगलमय केले.

यानंतर आयोजित सभेला मान्यवरांनी संबोधित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचल्यानंतर जगातील सर्व धर्मांचे सार लक्षात येते. विकासाची खरी गरज आज या वस्त्यांमध्ये असून भारतीय जनता पार्टी याबाबत संवेदनशील आहे. गरिबांचे शिक्षण, सामाजिक स्थिती याबाबत भाजपाचे केंद्र सरकार व भाजपाप्रणित महाराष्ट्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक मिलिंद कांबळे यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेऊन बौद्ध समाज बांधवांनी स्वतःचा विकास करून घ्यावा. यासाठी भाजपा सदैव सहकार्याच्या भूमिकेत राहील. या कार्यक्रमासाठी श्री. अभिजीत शेट्ये, श्री. रूपेश कदम, श्री. मिथुन निकम, श्री. विनोद म्हस्के, श्री. वैभव कदम, श्री. सतेज नलावडे, श्री. संकेत कदम, विजय गुरव, विनय अणेराव आदी भाजपा पदाधिकाऱ्यांसहित श्री. चंद्रकांत जाधव, श्री. राजाराम जाधव, श्री. प्रमोद जाधव, श्री. चंद्रमणी जाधव, श्री. विकास जाधव, सौ. आकांक्षा जाधव, सौ. साक्षी जाधव, सौ. सुवर्णा जाधव, सौ. विद्या जाधव आदिंसह स्त्री-पुरुष-युवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button