आपला जिल्हा

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यावर अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; घरावर व हॅाटेलवर एसीबीची धाड

रत्नागिरी – शिवसेनेचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर व हॅाटेल वर एसीबी चे डी.वाय.एस.पी सुशांत चव्हाण याच्या पथकासह २० अधिकारी कर्मचारी दाखल होत १८ जानेवारी रोजी सकाळी धाडी टाकल्या.

एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी

त्यांचे राहते घरी, भावाच्या घरी व त्यांच्या मालकीच्या हॉटेल मध्ये ही धाड पडली आहे. आमदार राजन साळवी हे घरी उपस्थित आहेत त्यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली गेली आहे साळवी यांना या आधी अनेक वेळेला चौकशीसाठी बनवण्यात आले होते त्यावेळी त्यांनी पूर्णपणे सहकार्य केले होते आज अचानक त्यांच्या निवासस्थाने व व्यवसायावर धाडी घालण्यात आल्या आहे.

रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीतील ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येऊन त्यांच्या ताब्यात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण ३,५३,८९,७५२ /- रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच १८८.९६% अपसंपदा संपादित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे व त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर केला नाही म्हणून गैरहर्जदार यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ संशोधन २०१८ चे कलम १३ (१) (ब) सह १३(२) प्रमाणे तसेच गैर अर्जदार यांची पत्नी व त्यांचा मुलगा यांनी ही अपसंपदा आहे ही माहित असून ही त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचे स्वतःचे नावे मालमत्ता धारण करून कब्जात बाळगणे कामी श्री राजन प्रभाकर साळवी यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 संशोधन २०१८ चे कलम १२ प्रमाणे आज दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री सुशांत चव्हाण पोलीस उपअधीक्षक ला.प्र. वि. रत्नागिरी हे करीत आहेत. त्या अनुषंगाने आमदार श्री राजन साळवी यांचे घर हॉटेल कार्यालय व इतर सात संबंधित ठिकाणी एकाच वेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत घडझरती सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button