आरवली – येडगेवाडी मार्गावरील शिर्केवाडी व्हाया जाणा-या एसटी बसफे-या अचानक रद्द झाल्याने शालेय विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरीकांची गैरसोय

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी मार्गावर सकाळी ०६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत देवरुख आगाराच्या चार एसटी बसफे-या सुरु आहेत या सर्व बसफे-या राजिवली शिर्केवाडी व्हाया करुन येडगेवाडीत जात होत्या मात्र दोन दिवसांपासून या सर्व बसफे-या अचानक रद्द करुन श्री. वरदानदेवी मंदीरापासून प्रजीमा ४४ मार्गावरुन जात असल्याने शिर्केवाडी येथील शालेय विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरीकांची गैरसोय होत असल्याची तक्रार मांडण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी याबाबत रत्नागिरी विभागीय नियंत्रक यांना पत्र लिहून देवरुख आगारातून सुटणा-या बसफे-या शिर्केवाडी मार्गे पु्र्ववत करण्याची मागणी केली आहे.
राजिवली शिर्केवाडीमार्गे जाणा-या मात्र सध्या रद्द झालेल्या एसटी बसफे-या
१ ) देवरुख – येडगेवाडी : सकाळी ६ वाजता ( देवरुख आगार वेळ )
२ ) माखजन – येडगेवाडी : सकाळी १०.१५ वाजता ( माखजन स्थानक वेळ )
३ ) माखजन – येडगेवाडी : दुपारी १४.४५ वाजता ( माखजन स्थानक वेळ )
४ ) देवरुख – येडगेवाडी : दुपारी १५.४५ वाजता ( देवरुख आगार )



