आपला जिल्हा

रंजिता चॅरिटेबल फौंडेशन तर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण व नवदुर्गा सन्मान

चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – काळात रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा मुख्याधिकारी चिपळूण नगर परिषद श्री प्रसाद शिंगटे,मा उप अधीक्षक चिपळुण पोलिस ठाणे श्री राजेन्द्र राजमाने,माजी आमदार रमेश भाई कदम,कायदेशीर सल्लागार ॲड श्री तेजस कोरगांवकर,माजी नगराध्यक्षा सौ सावित्री होमकळस,माजी सरपंच डॉ सौ.रहीमत जबले,महीला अधिकारी सौ.माधवी जाधव
यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत २७ स्पर्धेकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेत सहा जणांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

दोन स्पर्धेकांना विशेष पुरस्कार देण्यात आले.तर स्पर्ध मध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धेकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

गणपती सजावट प्रथम क्रमांक उत्तम कारेकर, द्वितीय क्रमांक सुनिता महाडिक,
तृतीय क्रमांक वंदेश चव्हाण

उत्तेजनार्थ
राज गुरव, आदित्य घेवडेकर, वैष्णवी पाटकर
गौरी सजावट प्रथम क्रमांक, प्रियंका जाडकर,द्वितीय क्रमांक अभिषेक बुरटे
तृतीय क्रमांक रसिका चौधरी

उत्तेजनार्थ
वर्षाराणी गायकवाड,नीता पवार,वेदिका बुरटे

विशेष पुरस्कार, प्रतिक बैकर,मंगेश भडवळकर या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर कुटुंब समाज तसेच कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात अश्या कर्तृत्ववान महिला आशा सेविका यांचा नवदुर्गा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली कदम, सुप्रिया गुरव,सीमा चाळके, प्रणिता घाडगे, समीना परकार,अनुजा भोसले,नेत्रा पाटील,स्नेहल घाडगे,आरती नारकर, प्रियंका कारेकर,सफा गोटे,दिपा कोलतेकर,राधा शिंदे, प्रिया शिंदे,मिनल गांधी,दिपीका कोतवडेकर,फातिमा मुसा,बिलाल पालकर,अजमल पटेल,संतोष घाडगे उपस्थित होते.फाऊंडेशन च्या अध्यक्ष रंजिता ओतारी यांनी प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन.श्री बाळू सनगरे यांनी केले.संस्थेचे उपाध्यक्ष वनिता काशिद,सचिव विशाल ओतारी, सदस्य दिप्ती सावंत देसाई,पल्लवी महाडिक, सईदा शेखदारे,सोनल कारेकर,अश्रफ बेबल,नियाज सनगे, मुजफ्फर चिपळूणकर,सागर ओतारी,
या सगळ्यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा संपन्न झाला.सर्व स्तरातून रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button