आपला जिल्हा

मुंबई महानगरपालिका उपक्रम ; घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सखोल स्वच्छता मोहीम

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – सी विभागातील घनकचरा व्यवस्थापन खाते अंतर्गत सतत सखोल स्वच्छता मोहीम सी विभगात अनेक ठिकाणी राबविण्यात येत आहे . होळीचा सण आल्याने यावेळी दिनांक २३ रोजी काळबादेवी येथील लोहार चाळ , मुंबादेवी, झवेरी बाजार व काळबादेवी परिसरात या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .

सखोल स्वच्छता मोहीम मध्ये घनकचरा व्यवस्थापन मधील सर्व कर्मचारी रस्त्यावर पाणी मारून साफ सफाई तसेच धुवाफवारणी करत आहेत . यामुळे मच्छर चे प्रमाण कमी होत आहे. व विभागात सखोल साफसफाई होत आहे तसेच घनकचरा विभागाचे अधिकारी व सफाई सखोल स्वच्छता मोहीम मेहतीने राबवत आहेत….

यावेळी सी विभाग सहाय्यक आयुक्त उद्धव चंदनशिवे , घनकचरा सहाय्यक अभियंता सी विभाग संजय गवळी आदी महापालिका अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Back to top button