आपला जिल्हा
आरवली – येडगेवाडी रस्त्याकडेची वाहनांना अडथळा ठरणारी झाडी तरुणांच्या पुढाकाराने तोडली

आरवली – संगमेश्वर तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ या रस्त्यावरील कुंभारखाणी येथील रस्त्याला अडथळा ठरणारी झाडी तरुणांनी पुढाकार घेत साफ केली. या झाडीमुळे वाहनचालकांना वळणावर दिसत नयल्याने अपघाचांची शक्यता होती.
आरवली – येडगेवाडी प्र.जि.मा ४४ च्या रस्त्यावरील झाडी तोडणासाठी संजय शिंदे, प्रतिक सुर्वे आणि इतर तरुणांनी श्रमदान करत मेहनत घेतली



