नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या “गुड बुक” मधील अजय शिंदे यांच्याकडे मध्यवर्ती गुन्हे शाखेची जबाबदारी

नवी मुंबई – एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अजय शिंदे यांनी अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल, गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून नागरिकांमध्येही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक भावना होती.नवी मुंबई पोलीस दलातील बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या गुड बूक मधील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्याकडे पोलीस आयुक्तालयात मध्यवर्ती गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे एक सक्षम, अभ्यासू आणि परिणामकारक अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता ते शांतपणे आणि प्रभावीपणे प्रशासन चालवत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे आणि जनतेचा विश्वास संपादन करणे यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.
विशेष म्हणजे, पोलीस दलातील महत्त्वाच्या आणि तथाकथित “क्रीम पोस्टिंग” मानल्या जाणाऱ्या ठिकाणांवर नियुक्त्या करताना त्यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता गुणवत्ताधारित निर्णय घेतल्याचे बोलले जाते. गेल्या चार वर्षांत अनेक सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना संधी देत त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.



