आपला जिल्हा
आरवली – येडगेवाडी मार्गावरील कुचांबे मोरीची श्रमदानातून साफसफाई ; कुचांबे उपसरपंच समीर चव्हाण यांचा पुढाकार.

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी प्र.जि.मा ४४ या मार्गावरील कुचांबे श्री. परेश टाकळे यांच्या घराशेजारील मुख्य मोरीच्या पाईपमध्ये वाळू आणि माती मिश्रीत गाळ येवून साचल्याने अनेक वेळा पाणी साचून वाहतूक ठप्प होत होती तर मोरीच्या दोन्ही बाजूने झाडी वाढल्याने पाणी प्रवाह थांबला जात होता यावर उपाय म्हणून २ ॲाक्टोबर २०२४ रोजी कुचांबे उपसरपंच समीर चव्हाण आणि कुचांबे गुरववाडीतील कार्यकर्त्यांनी पाणी प्रवाहास अडथळा ठरणारी झाडी तोडून त्या ठिकाणचा गाळ काढत पाणी प्रवाहास वाट मोकळी करुन दिली. समीर चव्हाण आणि कुचांबे गुरववाडीतील कार्यकर्त्यांनी श्रमदानातून केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे.



