आपला जिल्हा

कडवई येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा ; रिक्षा संघटनेकडून माजीसैनिकांचा सत्कार.

आरवली, मिलींद चव्हाण

आरवली – संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने तुरळ कडवई चिखली अशी प्रभातफेरी काढण्यात आली .कडवई बाजारपेठ येथे सरपंच विशाखा कुवळेकर यांचे हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने माजीसैनिकांचा सत्कार करण्यात आला .

कडवई येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . सकाळी रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने तुरळ कडवई चिखली अशी रिक्षारॅली काढण्यात आली. या रॅलीत ८५ रिक्षा सामील झाल्या होत्या.रॅलीत द्वानिक्षेपकवर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती . रिक्षा संघटनेच्या वतीने कडवई तुरळ चिखली येथील शाळांमध्ये चॉकलेट वाटप करण्यात आले .

कडवई बाजारपेठ येथे सार्वजनिक झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला .यावेळी सरपंच विशाखा कुवळेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . भाईशा घोसाळकर हायस्कुल , महाराष्ट्र उर्दू हायस्कुल व दि इंग्लिश स्कुल कडवई च्या विध्यार्थ्यांनि देशभक्तीपर गितगायन केले. यावेळी रिक्षासंघटनेच्यावतीने माजीसैनिक अंकुश साळुंके व परशुराम कदम यांचा सत्कार करण्यात आला .

अशारीतीने कडवई पंचक्रोशीतील सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Back to top button