शृंगारपूरचे सरपंच विनोद उर्फ बाबू पवार यांची उबाठा सेनेच्या उपतालुका प्रमुखपदी निवड

संगमेश्वर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शृंगारपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद उर्फ बाबू पवार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संगमेश्वर, माखजन व कडवई जिल्हा परिषद गटाचे उपतालुकाप्रमुख पदी पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्यावतीने नेमणूक करण्यात आली आहे.
श्री. पवार यांना पक्ष वाढीसाठी माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडुन अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी मंत्री रविंद्र माने , संपर्क प्रमुख सुरेश कदम , जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे , तालुका प्रमुख नंदादिप उर्फ बंड्या बोरुकर , उप तालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, तिवरेचे माजी सरपंच गोटया सावंत, कार्यकर्ते प्रशांत पांचाळ आदि उपस्थित होते.
विनोद पवार यांनी गावातील अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. वेळप्रसंगी आंदोलन, उपोषण करुन प्रश्न मार्गी लावले आहेत. गावातील ऐतिहासिक स्थळांच्या विकसित करण्यावर देखील त्यांचा नेहमीच भर राहिला आहे.
तळागाळात काम करणार्या सामान्य कार्यकर्त्याला उप तालुकाप्रमुख पद मिळाल्यामुळे अनेकांकडुन समधान व्यक्त केले जात आहे. त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.



