राष्ट्रवादी कॅाग्रेंस पार्टी ( AP ) आरवली पंचायत समिती गणातून कुंदा येडगे इच्छुक उमेदवार

आरवली – सध्या निवडणूकीचा धामधूम सुरु असून आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास राजकीय पक्षाने सुरुवात केली आहे अशातच आरवली पंचायत समिती गणातून कुंदा तुकाराम येडगे या इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या आरवली पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीकजून निवडणूल लढण्यास इच्छुक असून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
कुंदा येडगे या सन २०१२ ते २०१७ या पंचवार्षिक मध्ये राजिवली ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या जनसंपर्क चांगला असून ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या कामाचा त्यांना पंचायत समिती साठी फायदा होणार असून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे.
आरवली पंचायत समिती गणात आरवली, मुरडव, कोंडीवरे, बुरंबाड, आंबव, सरंद आणि माखजन ही गावे येतात. कुंदा येडगे या सध्या आरवली या ठिकाणी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून परीसरातील जनतेची कामे करत असून त्यांचा बचतगट महीलांसोबत चांगला संपर्क आहे. शासनाच्या सेवा केंद्राच्या माध्यमातून पंचक्रोशीतील जनतेची शासन दरबारी अनेक कामे होत आहेत.कुंदा येडगे यांच्या सकारात्मक कामामुळे त्या निवडून येतील असा विश्वास असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे यांनी देखील आपल्या पक्ष संघटनेकडे केली आहे.



