आपला जिल्हा

मुख्यमंत्र्यांकडून सन्मान ! गणेश इंगळे यांची पिंपरी – चिंचवड पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती ; पिंपरी – चिंचवड पोलीस उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

पुणे – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय कार्यक्षेत्रात गृह विभागाने तीन नवीन परीमंडळांना मान्यता दिल्यानंतर तातडीने तीन पोलिस अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात आली त्यामध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त गणेश इंगळे यांची बदली करण्यात आली आहे. गणेश इंगळे हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) या पदावर असताना पुणे पोलिसांनी ६०० कोटींचे अमली पदार्थ ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली होती त्यानंतर गृह विभागाने गणेश इंगळे यांना पुणे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या उपायुक्तपदी नियुक्ती दिली होती. या काळात चांगली कामगिरी केली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. गणेश इंगळे यांची सातत्यपुर्ण कामगिरी पाहून गृह विभागाने नुकतीच त्यांची बदली पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पोलिस उपायुक्त पदावर केली होती. गणेश इंगळे यांनी त्यांचा पिंपरी – चिंचवड पोलीस उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली.

गणेश इंगळे यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक शिक्षक म्हणून झाली होती त्यांनी पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत नायब तहसीलदार पद मिळविले या नंतर ही ते गप्प न बसता पुढे त्यांनी अभ्यास सुरुच ठेवला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पद मिळवत पोलिस प्रशासनात प्रवेश घेतला त्यांनी पोलिस अधिकारी म्हणून गडचिरोली जिल्ह्यातून आपल्या कामाला सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत चांगल्या कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रपती पदक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, बारामती त्यानंतर पुणे अशा विविध ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी पोलिस विभागाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करुन पोलिस हे जनेतेचे मित्र असल्याचे दाखवून दिले. सर्वसामान्य जनतेसाठी सदैव तत्पर राहून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणारे पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीत पोलीस अधिकारी म्हणून अनेक उल्लेखनीय कारवाया करुन जनेतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

गणेश इंगळे यांच्या पदोन्नती नंतर प्रथमच त्यांच्याकडे पिंपरी – चिंचवड सारख्या संवेदनशील शहराची पोलिस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अधिकारात येणाऱ्या कामाला ते न्याय देवून सकारात्मक काम करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पिंपरी – चिंचवड मधील वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आदी समस्या डोकेदुखी ठरत आहेत त्यातच आता गणेश इंगळे यांच्याकडे पिंपरी  – चिंचवड पोलिस आयुक्त कोणती स्वतंत्र जबाबदारी देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button