चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी अँड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. स्टार्टअप पुरस्काराने सन्मानीत ; माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांनी प्रशांत यादव यांच्याबद्दल काढले गौरवोद्गार
देवरुख - निलेश जाधव

देवरुख – रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्यावतीने चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी अँड मिल्क प्रोडक्टस प्रा. लि. काल रविवारी स्टार्टअप पुरस्काराने माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले आहे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. चे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी हा पुरस्कार सन्मानपुर्वक स्विकारला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांनी प्रशांत यादव यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
जिल्हा फेडरेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारापैकी सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. ला जाहीर झाला होता. उत्पादकता, रोजगार निर्मिती, एक्सपोर्ट, सामाजिक जबाबदारी अशा विविध गोष्टींची पडताळणी करून तज्ञ समितीने या पुरस्काराची निवड केली होती. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. चे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नाव असून याचे चेअरमन प्रशांत यादव आहेत. या पुरस्काराचे वितरण चिपळूण बहादूर शेख नाका येथील सहकार भवन येथे रत्नागिरी जिल्हा उद्योजकता विकास परिषदेमध्ये करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांच्याहस्ते वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. चे चेअरमन प्रशांत यादव यांना हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले कि, भविष्यामध्ये नोकरी हा विषय संपुष्टात येण्याची भीती आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीपूरक व्यवसायच आपल्याला तारूण नेवू शकतात. या सर्वांची जाण असलेला नेता म्हणजे देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार आहेत. आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प उभारला आहे. कोकणी माणसाने मनात आणले तर काय करू शकतो हे प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प उभारून दाखवून दिले आहे. त्यांनी हा प्रकल्प उभारून तरूणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी तरूणांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद असेच आहे, असे गौरवोद्गार सुरेशजी प्रभू यांनी काढले.
या पुरस्कार वितरणप्रसंगी पुरस्कार प्राप्त उद्योजकांचे फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, चिपळूण नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, गद्रे मरीन्सचे दिपक गद्रे, माजी आमदार डाँ. विनय नातू, माजी आमदार रमेशभाई कदम, माजी सहकार आयुक्त श्री. पाटील, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, निलेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, संगमेश्वर तालुकाध्यक्ष बाबा साळवी, देवरूख शहराध्यक्ष निलेश भुवड, पप्पू नाखरेकर आदिंसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



