आपला जिल्हा

चिपळूण-संगमेश्वरसाठी आ. शेखर निकम यांनी करून घेतला ६० कोटींचा निधी मंजूर

चिपळूण – चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्प २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यासाठी ४८ कोटी व सार्वजनिक बांधकाम चिपळूण नवीन इमारतीसाठी ११ कोटी असा सुमारे ६० कोटींचा निधी मंजुर झाला असून आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना घवघवीत यश मिळाले आहे तर तर कधी नव्हे एवढा निधी आणण्याचा विक्रम आ. शेखर निकम यांच्या नावावर अधोरेखित झाला आहे.

चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक ते कुंभार्ली घाट रस्त्याची होणारी दुरावस्था व त्यामुळे पावसाळ्यात, वाहनांचे अपघात यामुळे ग्रामस्थांची व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्राधान्य देऊन या रस्त्यासाठी ११ कोटी निधी, राष्ट्रीय महामार्ग ६६ ते चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व सुशोभीकरण करणे व संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर या पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता अर्थसंकल्प २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चिपळूण तालुक्यातील विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील गुहागर-चिपळूण-कराड रस्ता या रस्त्यावरील मोठ्या पुलांची पुनर्बांधणी करणे, क्रश बॅरिअर, डेलीनेटर कॅट आईज बसविणे व थर्मोप्लॅस्टिक पेंट मारणे, संरक्षक भिंत बांधण, मोऱ्यांची दुरुस्ती करणे, मोऱ्यांच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे, कॉजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे या कामांचा यात समावेश आहे. असुर्डे-कुटरे-रस्त्यातील मोऱ्यांचे रुंदीकरण, चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता काँक्रीटीकरण व सुशोभीकरण करणे, कोंढे- करंबवणे रस्ता कमकुवत लहान पुलाची पुनर्बांधणी करणे या कामांनाही निधी मंजूर झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button