सा.बां अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर यांच्या मातोश्री विजया पाटणकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन

मुंबई – विनायक आणि मंदाकिनी आपटे यांची मोठी कन्या असलेल्या विजया पाटणकर यांचा जन्म १९३८ मध्ये झाला. विजया पाटणकर यांचे वडील एक प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ होते, जे नंतर महाराष्ट्र सरकारचे शिक्षण संचालक बनले.विजया पाटणकर यांचे दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले त्यांचा जीवनप्रवास हा संघर्षमय आणि प्रेरणादायी राहीला आहे.
विजया पाटणकर या बालपणापासूनच अतिशय हुशार आणि गुणवंत विद्यार्थिनी होत्या त्या १९६० सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आणि पूर्ण करणाऱ्या पहिल्या मुलींपैकी एक होत्या. त्यांच्या गुणवत्तेच्या शैक्षणिक कामगिरीमुळे, वयाच्या २० वर्षांत नागपूर येथील सरकारी विज्ञान संस्थेत सेंद्रिय रसायनशास्त्राच्या व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांनी नागपूर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या संचालकपदी पदोन्नती होईपर्यंत अत्यंत परिश्रम आणि समर्पणाने सेवा बजावली, जिथून ४० वर्षांच्या गुणवंत सेवेनंतर निवृत्त झाल्या.
विजया आपटे आणि अरुण पाटणकर यांचा प्रेमविवाह झाला होता त्यांचे दोघांचे वैवाहिक नाते खूप सुंदर होते. विजया आपटे यांचे कुटुंब भाडेकरू होते आणि अरुण पाटणकर यांचे कुटुंब त्यांच्या नागपूरच्या घरात स्वतः घरमालक होते. दोघांचेही प्रेम असल्याने अखेर त्यांनी प्रेनविवाह केला.५५ वर्षे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहिले.
विजया आणि अरुण पाटणकर या दांपत्याला दोन अपत्य होती त्यातील जेष्ठ कन्या मनिषा पाटणकर या आहेत तर दुसरे अपत्य अभिजीत हे आहेत. मनिषा पाटणकर या लहानपणापासूच हुशार होत्या त्या पुढे जावून सनदी अधिकारी झाल्या तर लहान भाऊ अभिजीत हे परदेशी शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतले पाटणकर यांचे चार सदस्यांचे कुटुंब होते.
१९८० च्या दशकात विजया पाटणकर यांना स्तनात ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. तो प्रसंग सुखी कुटुंबाला हादरवणारा होता. स्त्रीरोगतज्ज्ञांनी विजया यांना “दसरा-दिवाळी” नंतर बायोप्सी करण्याचा सल्ला दिला, पण विजया यांनी “अहो डॉक्टर कसला दसरा, कसली दिवाळी, लवकरात लवकर बायोप्सी करा असा धाडसी निर्णय घेवून डॅाक्टरांना बायोप्सी करण्यास सांगितले होते त्या खुप धाडसी होत्या .”दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध सर्जन डॉ. गोवर्धन यांनी बायोप्सी केली. ट्यूमर घातक असल्याचे निदान झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया आणि कठोर केमोथेरपी अधिक तीव्र रेडिएशनचा एक अतिशय वेदनादायक चक्र सुरू झाला. या काळात मनीषा या किशोरवयीन होत्या तर त्यांचे बंधू अभीजीत हे पुर्णपणे अज्ञानी आणि लहान होते ऐन आनंदाच्या जगण्याच्या वयात आनंद हिरावून घेणारा प्रसंग या कुटुंबाच्या वाट्याला आला होता. पण यावेळी विजया पाटणकर यांनी किशोरवयीन मनीषा आणि बालवयातच असलेल्या अभीजीत ला धीर देत”मला काही होणार नाही बाळांनों, मी बरी होणार आहे. तुम्ही स्वतःला जपा आणि स्वतःची काळजी घ्या.” असे सांगून दोन्ही मुलांना त्यावेळी शब्दांचे बळ देवून दोन्ही मुलांचा आत्मविश्वास वाडवण्याचे काम केले. विजया पाटणकर या ४० वर्षांपर्यंत कर्करोगापासून लढल्या आणि हिमतीने कुटुंबाला साथ दिली त्या धाडसी असल्याने डॅा.गोवर्धन यांनी त्यांचे कौतुक केले होते.
विजया पाटणकर यांनी ४० वर्षे नागपूरच्या विज्ञान संस्थेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवले मनीषा आणि अभीजीत हे नागपुरात पाटणकर मॅडमची मुले म्हणून ओळखली जात असे. विजया पाटणकर यांच्या प्रतिष्ठेचा त्यांचा मुलांना खूप अभिमान वाटायचा . आजही विजया पाटणकर मॅडमच्या विद्यार्थी वर्गाकडून त्यांच्या शिकवणीने कौतुक होते.
अरुण पाटणकर यांची मुलांना आयएएस करण्याची महत्त्वाकांक्षा होती त्यांच्या दोन मुलांपैकी किमान एकाने “थेट आयएएस अधिकारी” व्हावे. विजया नेहमीच बॅक-एंड सपोर्ट पुरवायचा. विजया पाटणकर यांच्या पाठींब्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या कन्या मनीषा पाटणकर या आयआरएस अधिकारी झाल्या मनिषा म्हैसकर पाटणकर या सध्या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अप्पर मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत त्यांनी त्यांच्या आईकडून प्रेरणा घेवून काम केले. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी आई च्या आठवणींना उजाळा देत सोशल मिडीयावर पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली.



