आपला जिल्हा
कंत्राटी कामगार संघाच्या अलोरे कार्यालयाचे प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन

अलोरे – महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व कंत्राटी कामगार संघ शाखा कोयना प्रकल्प अलोरे या संघटनेच्या कार्यालयाचे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले.
यावेळी शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख विनोद झगडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पवार, तालुक्याचे सहसचिव संजय डेरवणकर, कामगार संघांचे कोयना प्रकल्प अध्यक्ष रमेश सुतार, शाखाध्यक्ष अनिल शिंदे, सचिव अक्षय जाधव, खजिनदार किरण धापसे, सल्लागार मुबारक हडपोलकर, निलेश कदम, प्रसाद लाड, सुरेश देवरुखकर, राकेश चव्हाण, वसंत चिपळूणकर, जमीर कडवईकर, सुशांत साळवी, पप्प्या शिंदे, रुपेश आवले, मोहनशेठ चव्हाण, हसन अनवारे यांच्यासह कामगार, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



