आपला जिल्हा

रांगव मिरगलवाडी ग्रामस्थांचा आमदार शेखर निकम यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील रांगव मिरगलवाडी येथील ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) मध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला आहे.

सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी ग्रामविकासाच्या विविध प्रश्नांवर आमदार निकम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. ग्रामस्थांचे म्हणणे मनपूर्वक ऐकून घेत आमदार निकम म्हणाले, “माझ्यासाठी राजकारण हे सत्ता नव्हे, तर गावोगावी विकास घडवणे हेच खरं ध्येय आहे. ग्रामस्थांनी आमदार निकम यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे प्रभावित होऊन पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला.

या प्रवेश सोहळ्यात सुधीर मिरगळ, प्रकाश मिरगळ, विजय कांबळे, दीपक कांबळे, शुभम खेडेकर, ओमकार खेडेकर, विकास मिरगळ, एकनाथ कांबळे, संदीप तटकरे, यशवंत तटकरे, अनिकेत तटकरे, विलास मिरगळ, विनोद कांबळे, विजय खेडेकर आदी ग्रामस्थांचा समावेश होता. या कार्यक्रमाला राजेंद्र सुर्वे (संचालक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक), संतोष भडवळकर, सुशील भायजे, कौस्तुभ सुर्वे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button