आपला जिल्हा

आरवली – येडगेवाडी मार्गावरील सर्व एसटी बसेस शिर्केवाडी व्हाया जाणार ; देवरुख आगाराकडून वाहक – चालकांना सूचना

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी मार्गावर सकाळी ०६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत देवरुख आगाराच्या चार एसटी बसफे-या सुरु आहेत या सर्व बसफे-या राजिवली शिर्केवाडी व्हाया करुन येडगेवाडीत जात होत्या मात्र या सर्व बसफे-या अचानक रद्द करुन श्री. वरदानदेवी मंदीरापासून प्रजीमा ४४ मार्गावरुन जात होत्या त्यामुळे शिर्केवाडी येथील शालेय विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरीकांना पायपीट करावी लागत होती.

सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी आणि राजिवली ग्रामपंचायत सरपंच दिपीका सावंत यांनी याबाबत रत्नागिरी विभागीय नियंत्रक आणि देवरुख आगारप्रमुख यांना पत्र लिहून देवरुख आगारातून सुटणा-या बसफे-या शिर्केवाडी मार्गे पु्र्ववत करण्याची मागणी केली होती स्थानिक मागणीचा विचार करुन या मार्गावरील सर्व एसटी बसफे-या आज दि. ८ ॲाक्टोबर २०२४ पासून शिर्केवाडी व्हाया पुर्ववत करण्याच्या सूचना दिल्याची माहीती देवरुख आगाराचे प्रभारी श्री.एस.डी.जाधव यांनी दिली आहे.

राजिवली शिर्केवाडीमार्गे जाणार या एसटी बसेस

१ ) देवरुख – येडगेवाडी : सकाळी ६ वाजता ( देवरुख आगार वेळ )
२ ) माखजन – येडगेवाडी : सकाळी १०.१५ वाजता ( माखजन स्थानक वेळ )
३ ) माखजन – येडगेवाडी : दुपारी १४.४५ वाजता ( माखजन स्थानक वेळ )
४ ) देवरुख – येडगेवाडी : दुपारी १५.४५ वाजता ( देवरुख आगार )

Related Articles

Leave a Reply

Back to top button