आपला जिल्हा

दिशा दाभोळकर यांच्या माध्यमातून आयोजित नवरात्रौत्सवानिमीत्त खेर्डीतील महिलांसाठी देवदर्शनाला सलग दुसऱ्या दिवशी देखील प्रचंड प्रतिसाद

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय *श्री.शेखरजी निकम सर* पुरस्कृत व खेर्डी ग्रामपंचायत चे माजी सरपंच *श्री.दशरथ शेठ दाभोळकर* यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस दिशाताई दशरथ दाभोळकर यांच्या माध्यमातून खेर्डीतील महिलांसाठी नवरात्रौत्सवा निमीत्त शनिवार दि.5 ऑक्टोंबर व रविवार दि.6 ऑक्टोंबर या दोन दिवस चिपळूण तालुक्यातील नऊ देवींच्या दर्शनाची मोफत सुविधा उपलब्ध केली होती.

आज रविवार दि.6 ऑक्टोंबर ला सकाळी ठिक 9 वाजता खेर्डीतुन देवदर्शनासाठी गाड्या निघाल्या त्याचा शुभारंभ राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ.दिशाताई दाभोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

आज या देवदर्शनाच्या उपक्रमाच्या दुसर्‍या दिवशी देखील खेर्डीतील बहुसंख्य महिलांनी प्रचंड प्रमाणात याचा लाभ घेतला.खेर्डीतील महिलांसाठी नवरात्रौत्सवानिमीत्त देवदर्शनाच्या या आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्व महिलांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ.दिशाताई दाभोळकर यांचे आभार मानले.

यावेळी ग्रा.पं सदस्या सौ.प्रणाली दाभोळकर,ग्रा.पं सदस्य श्री.रियाज खेरटकर,ग्रा.पं सदस्य श्री.राकेश दाभोळकर,सौ.रश्मी दाभोळकर,सौ.छाया मिरगल,श्री.सचिन भोसले,श्री.संभाजी यादव,खेर्डीतील सर्व महिला व मित्र परिवार उपस्थित होता..

Related Articles

Leave a Reply

Back to top button