आपला जिल्हा

जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ ची ‘हर घर तिरंगा’ प्रभातफेरी संपन्न.

संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. पिरंदवणे नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज गावातून उत्स्फूर्त प्रभातफेरी काढत गावामध्ये राष्ट्रभक्तीचा जागर केला. आवेशपूर्ण घोषणा अत्यंत उत्साहाने व अभिमानाने देत विद्यार्थी चालले असता ग्रामस्थही यामध्ये सहभागी झाले.

‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण, उपशिक्षक श्री. कुलदीप देशमुख, श्री. सचिन इंगळे तसेच पदवीधर शिक्षक श्री. योगेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. संतोष चव्हाण म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम मनावर देशभक्तीचे संस्कार व्हावेत हा उद्देश या प्रभातफेरीने साध्य झाला. दि. ९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानातील उपक्रम विद्यार्थी आवडीने करत असून त्यांच्यामध्ये राष्ट्राप्रति श्रद्धा आणि दुर्दम्य अभिमान जागृत होत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button