आपला जिल्हा

शिरगाव येथे वाशिष्ठी डेअरी शॉपीचे उद्घाटन

चिपळूण –  वाशिष्ठी डेअरी शॉपीचे शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्टी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले.

गेल्या वर्षभरापूर्वी जनतेच्या त रुजू झालेल्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाने येथील शेतकऱ्यांना रोजगाराचा मार्ग दिला आहे. तर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. यामुळेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या शॉपीना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. काही शॉपी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. तर काही शॉपी शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना चालवण्यास दिल्या जात आहेत. यामुळे या सर्वांना वाशिष्ठी डेअरी शॉपीमुळे आर्थिकतेचा मार्ग मिळाला आहे.

तर आता शिरगाव येथे वाशिष्ठी डेअरी शॉपीचे उद्घाटन झाले आहे. यावेळी सुरजराव शिंदे, नागेश शिंदे, सदाशिवराव शिंदे, गणेशराव शिंदे, शिवराज कापडी, उदय देवळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या शॉपीमुळे वाशिष्ठी डेअरीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button