रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णीं यांना उच्चश्रेणीत बढती ; इंटरपोल ते रत्नागिरी पोलिस अधिक्षक कारकिर्द कौतुकास्पद

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना उच्चश्रेणी बढती देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बदलीचे आदेश नसल्याने ते सध्या रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणूनच काम करणार असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या उच्चश्रेणी बढतीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून जिल्ह्यात शांतता प्रस्थापीत करण्यासाठी चांगले काम केले आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई पोलिस दलात ही लक्षणीय कामगिरी केली आहे तर सन २०१४ ते २०१६ या दोन वर्षात ते मुंबई पोलिस आयुक्त यांचे प्रवक्ते म्हणून काम पाहीले आहे.
पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी इंटरपोल आंतरराष्ट्रीय संघटनेत सिंगापोर या ठिकाणी काम केलेले आहे. ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना आहे. ज्यामध्ये 192 सदस्य देश या संस्थेशी जोडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारीविरोधात एकत्रितरित्या लढण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.



