आपला जिल्हा

चिपळूण भाजपाच्या वतीने दिवाळीनंतर होणार विकासकामांचे भूमिपूजन

महाविजय २०२४ चा संकल्प

चिपळूण – चिपळुणात भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते दिवाळीनंतर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. भाजपाच्या वतीने महाविजय २०२४ चा संकल्प करण्यात आला असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी सांगितले.

चिपळूणात भाजपा जोर धरू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख, माजी आमदार प्रमोद जठार साहेब यांच्या हस्ते दिवाळीनंतर विकासकामांचे भूमिपूजनांचा नारळ फोडून महाविजय २०२४ चा संकल्प करण्यात येणार आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत पक्षाच्या माध्यमातून चिपळूणात कोट्यवधी रुपयांचा निधी आला. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून विकासकामांचा एकही नारळ फुटला नाही. त्याचे श्रेय स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतले. ‘फिरसे एक बार मोदी सरकार, महाविजय २०२४’ चा नारा देत चिपळुणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका लावला जाणार आहे. दिवाळीनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माजी आमदार आमदार प्रमोद जठार यांच्या जिल्हा परिषद गट प्रमाणे दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे आणि मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजनांचा नारळ फोडून महाविजय २०२४ चा संकल्प केला जाणार आहे, असे भाजपाचे चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button