आपला जिल्हा

संगमेश्वर पंचायत समिती पाणी पुरवठा उप अभियंत्यावर कारवाई ; कामात अनियमिता केल्याच्या तालुक्यातून २८ तक्रारी.

संगमेश्वर – तालुक्यातील पंचायत समिती पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता आर.एल लठाड यांच्या विरोधात संगमेश्वर तालुक्यातून जनतेच्या २८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील बहुसंख्य तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या आहेत. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने या तक्रारींचा निपटारा केला नाही त्यामुळे त्याची जिल्हास्तरीय जलजीवन मिशन तक्रार निवारण समितीने गंभीर दखल घेत त्या तक्रारीचा अहवाल जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांच्याकडे सोपवला असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.२० मार्च २०२४ रोजी उप अभियंता आर.एल लठाड यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेण्याचे आदेश पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांना दिले होते.

जल जीवन मिशन जिल्हा तक्रार निवारण समितीकडील अहवलानंतर जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी आर.एल. लठाड यांच्याकडील पदभार काढून तो चिपळूण पंचायत समिती पाणी पुरवठा उप अभियंता विश्वनाथ झिंगे यांच्याकडे देण्याचे आदेश दिले आहेत मात्र विश्वनाथ झिंगे २८ मार्च पर्यंत रजेवर असल्याने संगमेश्वर ( देवरुख ) उप अभियंता पदाचा प्रभारी पदभार अविनाश जाधव यांच्याकडे राहणार आहे.

संगमेश्वर पंचायत समिती पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन कामात अनियमिता केल्याची तक्रारीचे पत्र संतोष येडगे यांनी दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी कोकण आयुक्त डॅा. महेंद्र कल्याणकर यांना दिले होते. कोकण आयुक्त यांच्या आदेशाने उपायुक्त गिरीश भालेराव यांनी १ मार्च २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांना या पत्रावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी या विषयी गंभीर दखल घेत सर्व तक्रारींचा अभ्यास केला असता उप अभियंता आर.एल लठाड यांच्या विरोधात २८ तक्रारी प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले त्यातील बहुतांश तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या असल्याचे निरीक्षण जल जीवन मिशन तक्रार निवारण समितीने मांडले आहे. जिल्हा तक्रार निवारण समितीच्या निष्कर्षानंतर पाणी पुरवठा उप अभियंता यांच्याकडील सध्याचा प्रभारी पदभार काढून घेण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्हा परीषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या खातेप्रमुख तथा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांना दिल्या होत्या. कोकण आयुक्त कार्यालय यांच्या सूचनेप्रमाणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांच्या आदेशाने अखेर मयुरी पाटील यांनी उप अभियंता आर.एल लठाड यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेत कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button