मुंबई – गोवा महामार्गावरील टॅंकरचे अपघात टाळण्यासाठी पोलिस अधिक्षक नितीन बगाटें च्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक ; पोलिस अधिक्षकांकडून मार्गदर्शक सूचना जारी.

रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या टॅंकर अपघातांची रत्नागिरी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, परीवहन, रस्ते ठेकेदार आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होतै.

बैठकीत पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी चालक आणि वाहक यांच्यासाठी खालीलप्रमाणे सूचना दिल्या.
▶️ टॅंकर चालकांची नियमीत तपासणी करावी.
▶️ चालकांना विशेष प्रशिक्षण द्यावे.
▶️ गाडी चालवताना मोबाईल चा वापर पुर्णपणे टाळावा.
▶️ दारु पिऊन गाडी चालवणा-यांवर कठोर कारवाई करावी.
▶️ टॅंकरच्या ताफ्यात सुरक्षित अंतर ठेवावे व वेग ताशी २० कि.मी पेक्षा जास्त असू नये याची खात्री करावी.
▶️ चालकाला गणवेश देणे अनिवार्य करावे.
▶️ प्रत्येक टॅंकरवर चालकासोबत एक मदतनीस असावा.
▶️ चालकाची थकवा तपासणी नियमीत करावी.
▶️ टॅंकरच्या सुरक्षा वॅाल्व्ह आणि चोकटी मध्ये आवश्यकतेनुसार बदल करावेत.
▶️ बचाव पथकाला आपतकालीन परीस्थिती हातळण्यासाठी प्रशिक्षण द्यावे.
राष्ट्रीय महामार्ग आणि परीवहन विभागासाठी सूचना.
▶️ रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षिततेची चिन्हे लावावीत.
▶️ रस्त्याचे बांधकाम वेगाने पुर्ण करावे.
▶️घातक वळणे आणि उतारांवर गतीरोधक चा वापर करावा.
▶️चालकांसाठी नियमीत तपासणी शिबीरे आयोजित करण्यात यावीत.
▶️टॅंकर्सची अचानक तपासणी करावी.
▶️ओव्हरलोडींग आणि दारु पिवून वाहन चालवणा-यांवर कठोर कारवाई करावी.
जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी अपघाताप्रकरणी तातडीच्या उपाययोजनेसाठी बैठक घेवून सूचना केल्याने समाधान व्यक्त आहे तर या उपाययोजनांमुळे अपघांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



