आपला जिल्हा

कुचांबे – येडगेवाडी रस्ता डांबरीकराला कामाला २३ जानेवारी पासून सुरुवात

रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील आरवली मुरडव कुंभारखाणी कुचांबे राजिवली रातांबी येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ या रस्त्याच्या कि.मी १७ ते ३३ मधील डांबरीकरण काम सुरु करण्याबाबत दिरंगाई होत होती. याबाबत संतोष येडगे यांनी सा.बां उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटावणे यांना काम सुरु करण्याबाबत विनंती केली होती. कार्यकारी अभियंता अमोल ओटावणे यांनी आढावा घेवून २३ जानेवारी पासून येडगेवाडी रस्ता डांबरीकरण काम सुरु करणेबाबत संबंधीत ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. आरवली – येडगेवाडी रस्ता डांबरीकरण काम मंजुर करुन घेण्यासाठी संतोष येडगे यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले होते.

कुचांबे ते येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ या रस्ता डांबरीकरण कामासाठी सन २०२१ या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. मात्र मधल्या कालावधीत काही अपरीहार्य कारणांमुळे या रस्त्याचे काम पुर्ण होवू शकले नव्हते या विषयी सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.ओटावणे यांनी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी येडगेवाडीला भेट देत या संपुर्ण रस्त्याची पाहणी केली होती. त्यांच्या पाहणी दौ-यात या कामातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन संतोष येडगे यांना दिले होते त्याप्रमाणे दि.३ मार्च २०२३ रोजी रत्नागिरी येथील कार्यालयात आढावा बैठक घेवून कामातील त्रुटी दुर करत कामाला सुरुवात करण्याच्या सूचना संबंधीत ठेकेदाराला दिल्या होत्या मार्च २०२३ मध्ये रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली होती मात्र वेळेअभावी काम पुर्ण न होवू शकल्याने उर्वरीत काम यावेळी सुरु करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आरवली – येडगेवाडी प्रजिमा ४४ मधील डांबरीकरण कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत या कामाकडे गांभीर्याने पाहत आहेत. ठेकेदाराने या कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना सा.बां विभागाच्या उपविभागीय अभियंता पूजा इंगवले, शाखा अभियंता अक्षय बोरसे यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button