आपला जिल्हा

गाव तिथे शाखा घर तिथे शिवदूत नियुक्त करा ; शिवसेनेचे रायगड लोकसभा निरीक्षक मंगेश सातमकर यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

चिपळूण शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात माजी आमदार, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन

चिपळूण – गाव तिथे शिवसेनेची शाखा, घर तिथे शिवदूत नियुक्त केले पाहिजेत. नुसते बोर्ड म्हणजे शाखा नव्हे तर शाखेचे कार्यालय असले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेंशी बोलू. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. शासकीय योजनांतून लोकांची सेवा करा. मतदार यादीचा अभ्यास करा. यातून पक्ष संघटना वाढीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे, असे आवाहन शिवसेना रायगड लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक मंगेश सातमकर यांनी चिपळूण-गुहागर- खेड विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकारी मेळाव्याप्रसंगी केले. हा मेळावा नुकताच चिपळूण -बहादूरशेखनाका येथील पुष्कर हॉलमध्ये झाला.

यावेळी माजी आमदार, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनीदेखील उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करूया, असे आवाहन केले.

यावेळी गुहागर विधानसभा तालुकाप्रमुख शरद शिगवण, गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी आपल्या मनोगतात शिवसेना नेते रामदासभाई कदम, पालकमंत्री ना. उदय सामंत विकासकामांसाठी निधी देत असले तरी गुहागर विधानसभा मतदारसंघात नेतृत्वाची उणीव असल्याचे बोलून दाखवले. तर सर्वसामान्य जनता तुमचा उमेदवार कोण? अशी विचारणा करतात. लोकांना बदल हवाय. तेंव्हा एकदा उमेदवार ठरू दे. जेणेकरून आम्हाला काम करणे सोपे होईल व गुहागर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तसेच गुहागर विधानसभा संघटक चंद्रकांत चाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे यांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने माहिती दिली. तर प्रास्तविकात गुहागर-खेड विधानसभा तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांनी मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावा दिला.

यावेळी सहसंपर्कप्रमुख शंकर कांगणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, सहसमन्वयक राहुल बामणे, युवती सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवानी खानविलकर, युवा सेना उपजिल्हाधिकारी सचिन काते, महिला आघाडी संघटक सानिका आंब्रे, खेड युवासेना अधिकारी सुरज रेवणे, तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, चिपळूण युवासेना अधिकारी विक्रांत चव्हाण, खेड तालुका संघटक मनोज आंब्रे, चिपळूण तालुकाप्रमुख संदेश आयरे, जिल्हा समन्वयक शशिकांत वाघे आधी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button