आपला जिल्हा

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडून लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या सेवा कार्याचे कौतुक.

रत्नागिरी -रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी  यांनी लायन्स क्लब रत्नागिरी , यांचे मार्फत होत असलेल्या विविध सेवा कार्याबद्दल विशेष कौतुक केले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या नुकत्यात झालेल्या प्रमोशनसाठी सर्व लायन्स क्लब सभासदांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी लायन्स क्लबच्या कामांचे कौतुक करताना लायन्स क्लब कडून भविष्यात कोणतेही सेवा कार्य करत असताना पोलिसांचे सहकार्य हवे असल्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन देखील त्यांनी लायन्स क्लब ला केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध उपक्रम घेऊन रत्नागिरीतील बीच परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपाययोजना लायन्स क्लब ने कराव्यात असे देखील त्यांनी सुचविले. लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे शुभेच्छा देण्यासाठी २०२४ -२५ या लायनिस्टिक वर्षातील लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.गणेश धुरी, सचिव कु. विशाल ढोकळे . खजिनदार अमेय विरकर, त्याचप्रमाणे लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा लायन शिल्पा पानवलकर, पराग पानवलकर, ला. यश राणे, ला. शरद नागवेकर, ला. सुमित ओसवाल , ला. ऍड. महेंद्र मांडवकर, ला. संकेत नवले, आदी ला मेंबर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button