आपला जिल्हा
भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी शालेय पोषण आहार बनवणा-या महीलांच्या व्यथा ऐकूण घेतल्या

लांजा – आज दि. २० नोव्हेंबर रोजी राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा क्षेत्रातील लांजा तालुक्यातील आरगाव येथे विधानसभा निवडणूक सहप्रमुख तथा भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत आर्थिक दृष्टया सक्षमीकरण कसे करता येईल यासाठी त्यांच्या पाठीशी कायम उभी असेन असे आश्वस्त केले. यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्षा परिणीती सावंत, भाजप सरचिटणीस दीक्षा खामकर, रसिका सावंत यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.



