आपला जिल्हा

जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्या तंबीनंतर जलजीवनच्या ठेकेदारांची तारांबळ.

जलजिवनची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासनाचे जोरदार प्रयत्न.

अलिबाग – रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्यासोबत जलजिवन बाबत आढावा बैठक घेवून कडक कारवाईची तंबी दिल्यानंतर अधिका-यांसह ठेकेदारही ताळयावर आले असून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली आहे.

चालु योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रीया कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार ४२२ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत, या योजनांचे काम २०२४ पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आतापर्यंत 95 योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच रायगडमध्ये जलजीवनचे दहा टक्केही काम पूर्ण नाही, आणि जिल्हा परिषद प्रशासन १४२२ पैकी ९५ योजना पूर्ण झाल्याचे कौतुक करीत असल्याची टीका अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या संगनमताने करोडोंची आर.ए.बिल उचलणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून केंद्र सरकारच्या “ईडी” कडे फसवणुकीबद्दल तक्रार दाखल करण्यात अशी मागणीच सावंत यांनी शासनाकडे केली होती.

संजय सावंत यांनी यापूर्वीच केंद्र सरकारकडे रायगड जिल्हयातील जलजिवन योजनेमधील अनागोंदी कारभारा बाबत तक्रार केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने रा.जि.प.कडून अहवाल मागविला होता. याबाबत राजिपच्या पाणीपुरवठा विभागाने सावंत यांना ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जिल्हयाचा प्रगती अहवाल माहितीसाठी दिला आहे.

ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जलजिवन योजनेचा प्रगती अहवाल.

तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना

रायगड जिल्ह्यात अलिबाग मधील 8 योजना पूर्ण यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 10, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 50 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 26 , कर्जत 6 योजना पूर्ण यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 14, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 35, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 33 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 33 , महाड ४ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 48, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 31, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 41 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 16 , माणगाव 2१ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 46, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 29 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 42 ,म्हसळा 7 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 17, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10 , मुरूड ७ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 7, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 9, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 27 , खालापरू 0 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 49, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6 ,पनवेल १ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 40, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 47, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 21 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10 ,पेण 9 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 14, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 27 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 29 , पोलादपूर १3 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 4, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 36, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 20 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6 , रोहा 8 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 28, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 38 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 45 , श्रीवर्धन १4 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 13, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 7 , सुधागड १० यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 37, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 26 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6 , तळा 4 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 5, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 11, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 12 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 18 , उरण १ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 12, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 5, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 2 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना अशा एकूण 113 योजना पूर्ण झाल्या आहेत

यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 246, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 394, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 345 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 272 अशा प्रकारे एकूण 1257 योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संजय सावंत यांना दिला आहे.

113 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर कामांना वेग आला आहे. पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना ठेकेदार-अधिकारी यांना दिल्या आहेत योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत.

संजय वेंगुर्लेकर
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,रायगड जिल्हा परिषद.

Related Articles

Leave a Reply

Back to top button