दि मुनिसिपल को- ऑपरेटिव्ह बँक संचालक विष्णू गजाभाऊ घुमारेंचा पोस्टाच्या टपाल तिकिटावर फोटो!
माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांच्याकडून वाढदिवसानिमित्त "माय स्टॅम्प" टपाल तिकिटाची भेट...

मुंबई – नोव्हेंबर हा दि मुनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक विष्णू गजाभाऊ घुमरेंचा वाढदिवस आपल्या सहकाऱ्याला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट द्यावी म्हणून दि मुनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक तथा माजी सिनेट सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य मुंबई विद्यापीठ प्रदीप सावंत यांनी संचालक विष्णू गजाभाऊ घुमरे यांची प्रतिमा असलेला टपाल तिकीट बनविण्यासाठी टपाल खात्याकडे निवेदन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दि मुन्सिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक तथा माजी आधिसभा सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य मुंबई विद्यापीठ प्रदीप सावंत यांना पोस्टाकडून दि मुनिसिपल को- ऑपरेटिव्ह बँक संचालक विष्णू गजाभाऊ घुमरे यांचा फोटो असलेला टपाल तिकीट जी पी ओ इथून ६ नोव्हेंबर रोजी देण्यात आले.व वाढदिवसाच्या पूर्व संध्येला “माय स्टॅम्प टपाल” विष्णू गजाभाऊ घुमरे यांनी अनावरण केले.
दी मुनिसिपल को ऑपरेटिव्ह बँक संचालक विष्णू गजाभाऊ घुमरे यांची थोडक्यात माहिती:
२००७ ते २०१२ रोजी अपक्ष उमेदवार म्हणून म्युनिसिपल बँकेवर प्रचंड बहुमताने विजयी झाले. २०१२ रोजी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकेवर गुलाबराव शेळके सॉलिसिटर यांचा पराभव करून विजयी झाले. २०१५ ते २०२० रोजी जय सहकार पॅनल ची निर्मिती करून १९ पैकी १३ जण निवडून आणून म्युनिसिपल बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले २०२० ते २०२५ रोजी जय सहकार पॅनल प्रमुख १९ पैकी १५ जण निवडून आणले. २०२२ ते २०२७ दुसऱ्यांदा मुंबई जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून आले. मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभाग चेंबूर पदनाम कनिष्ठ अवेक्षक कार्यरत आहेत.
अशा अनेक ठिकाणी विष्णू गजभाऊ घुमरे यांनी आपल्या कामातून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे…
वाढदिवसाचे निमित्त साधून प्रदीप सावंत यांनी आज आपल्या सहकार्याला “माय स्टॅम्प” टपाल तिकिटाच्या स्वरूपात वाढदिवसाच्या अनोख्या अशा शुभेच्छा दिल्या. आपले “माय ,स्टॅम्प” टपाल तिकीट पाहून विष्णू गजाभाऊ घुमरे यांनी प्रदीप सावंत यांचे कौतुक केले. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालिका वर्षा माळी, महावीर बनगर, विलास साळुंखे, राजेंद्र कराडे, मुकेश घुमरे , अभिषेक मोहिते,अभिजित बागुल, बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका, रवींद्र त्रिभुवने अनेक पदाधिकारी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त विष्णू गजाभाऊ घुमरे यांनी आपल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. हा क्षण आमच्या टीमने आपल्या कॅमेरा मध्ये टिपला व गजाभाऊ घुमरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…



