आंबेड बु ! ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी कृषी मेळाव्याचे आयोजन.

संगमेश्वर – तालुक्यातील आंबेड बु ! ग्रामपंचायतीचा वतीने गावातील शेतक-यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला तालुका कृषी अधिकारी येणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकरी, बागायतदार यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा होत नसलेल्या शेतक-यांच्या समस्या जाणून घेवून त्यातील तांत्रिक त्रृटी दूर करण्यात येणार आहेत. हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी आणि शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आंबेड बु! ग्रामपंचायत सरपंच सुहास मायंगडे, उपसरपंच शोएब भाटकर, ग्रामपंचायत सदस्या नुपुरा मुळ्ये, ग्रामपंचायत सदस्य राजेश आंबेकर आदी प्रयत्नशील असून अधिकाधिक शेतकरी, बागायतदारांनी या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सरपंच सुहास मायंगडे यांनी केले आहे.



