करजूवे गावभेट कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांचे ढोल-ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत
गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामस्थांनी कुंटुंबाप्रमाणे एकसंध राहीले पाहीजे- आमदार शेखर निकम

संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील गावभेटी कार्यक्रमात चाफे मोरेवाडी, मावळतील बाचिमवाडी, चांदिवडेवाडी, वाकसाळवाडी, ब्राम्हणवाडी, कांगणेवाडी येथील ग्रामस्थांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी करजुवे गावात विविध योजनेतून निधी मंजूर करुन विकास कामे केल्याबद्दल जल्लोशात स्वागत केले यावेळी ढोल-ताश्याच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीने मिरवणूक काढण्यात आली. करजूवे गावातील ग्रामस्थांच्या या अतुट प्रेमाने आमदार शेखर निकम भारावून गेले.
आमदार शेखर निकम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना करजुवे गावाकरीता 95 लाख रु निधी उपलब्ध करुन दिला. तसेच उर्वरीत विकास कामे करीता आवश्यक असणार निधीसुद्धा येणा-या काळात देणारच असे सुचित केले. मतदार संघाच्या विकासाठी सर्व ग्रामस्थांनी आपल्या कुंटुंबाप्रमाणे एकत्र राहीले पाहिजे, त्याप्रमाणे आपली मुले शिक्षण घेऊन उच्च शिक्षीत होऊन त्यांच्या माध्यमातून गावाची प्रगती झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी तालुका अध्यक्ष राजेद्र पोमेंडकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुशिल भायजे, माजी जि.प.सदस्य दिपक जाधव, माजी प.स.सदस्य नाना कांगणे, विभागप्रमुख मयुर बाष्टे,आंबव सरपंच शेखर उकार्डे, अक्षय चव्हाण, गुलाब सुर्वे, सुबोध चव्हाण, शैलेश चव्हाण, दिपक शिगवण, लहू सुर्वे, आर. के. बाचीम, अजय चांदिवडे, अरूण बाचिम, शांताराम बाचिम, पांडूरंग येलंवडे, प्रियांका मोरे, सिताराम बाचीम, भागोजी चांदिवडे, अनंत बाचीम, कृष्णा बाचीम, गोपाळ कांगणे, विष्णू मोरे, दिपक शिवगण, राजन पंडीत, राजू आंबेकर, सुनिल गोवळकर, अजय चांदिवडे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



