आपला जिल्हा

चिपळूण मध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

चिपळूण – सोमवार दिनांक ३० रोजी दुपारी तीन ते पाच यावेळी महिला मंडळ वडनाका चिपळूण येथे लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी , जिजाऊ ब्रिगेड सावर्डे चिपळूण,प्रयास फाऊंडेशन, हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर व समस्यावर शिबीर संपन्न झाले.यामध्ये सांधे दुखी, पाठ दुखी, पाठीचा कणा, कंबर दुखी यासाठी कशी काळजी घ्यायची, रोज कोणते एक्सर्साइज् किंव्हा सोपे सोपे व्यायाम करावेत व आपण दैनेंदिन रोजच्या धावपळीच्या आयुष्यात नेहमी कसे फ्रेश आणि फिट राहण्यासाठी वालावलकर हॉस्पिटल डेरवण चे फिजिओथेरपिस्ट डॉ. देविका शहा, डॉ सत्यज्ञा आणि डॉ आसावरी यानी अतिशय सुंदर, अप्रतिम असे मार्गदर्शन करून प्रात्येक्षित करून सर्व प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती स्क्रीन वर लाईव्ह प्रोजेक्टर वर दाखवण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या सन्माननीय सुमती ताई जांभेकर,सन्माननीय संपदा भोसले व डॉ. देविका या होत्या. या मार्गदर्शन साठी सर्व महिलांनी चांगला सहभाग घेऊन त्यांच्या शंका व त्यांना होत असलेल्या समस्या यावर निःसंकोचपणे डॉ. यांच्याशी संवाद ही साधला. जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून. जिजाऊ वंदना बोलून. पाहुण्याच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलन गुरव यांनी केले. अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात हा अतिशय महत्त्वाच्या काळाची गरज असणारा उपक्रम सर्वांच्या साथीने पार पडला.सन्माननीय सुमती ताई जांभेकर व सन्माननीय संपदा भोसले यांनी अतिशय सुंदर मोलाचे मार्गदर्शन केले व आमच्या करत असलेल्या कामाचे कौतुक ही केलें.यावेळी लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी च्या अध्यक्ष अंजली कदम , जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अनुजाताई भोसले , प्रयास फौंडे च्या अध्यक्ष रविना गुजर , जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल चव्हाण , तालुकाध्यक्ष मीनल गुरव , शहर अध्यक्ष वर्षा खटके , निर्मला जाधव , मालतीताई पवार , नेत्रा पाटिल, सीमाताई चाळके , सुप्रिया गुरव , स्वाती देवळेकर , प्राजक्ता सरफरे , डॉ वर्षा खानविलकर , प्रिया विचारे , दिप्ती सावंत देसाई,शमिना परकार, अरुणा घाडगे ,ऋतुजा देवळेकर माया गुहागरकर संचिता राजेशिर्के आणि इतर उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Back to top button