आपला जिल्हा

महाज्योती संस्थेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळण्यासाठी आझाद मैदान मध्ये बेमुदत उपोषण सुरु

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – ३० ऑक्टोबर मैदान या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरु झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या यादीनुसार इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागासप्रवर्ग यांच्या जातींची संख्या ४१२ असून एकूण लोकसंख्येच्या साधारण ५२% पेक्षा अधिक आहे, मात्र या समुदायाचे उच्चशिक्षणातील प्रमाण अत्यल्प आहे आणि संशोधनाच्या क्षेत्रात तर त्यांचे प्रमाण नगण्य आहे. २००८ मध्ये शिक्षणात आरक्षण लागू झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र सरकार वरील जमातीतील लोकांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखीत असून मागील वर्षी १२३८
लोकांना फेलोशिप देण्यात आली आणि ह्यावर्षी सुरुवातीला मात्र ५० आणि आता २०० जागा हा तुटपुंजा न्याय देवून हजाराहून अधिक लोकांना फेलोशिपचा हक्क नाकारत असून ओबीसी, भटके विमुक्त प्रती असंवेदनशीलता दाखवत आहेत. सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी संविधानिक पद्धतीने उपोषण सुरु आहे करीत आहोत ह्या
उपोषणासाठी महाराष्ट्रभरातून संशोधक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, संदीप आखाडे, सद्दाम मुजावर, अविनाश गुरव, ठकू पुजारी, विष्णू गोरे, सुदर्शन लोहार, जनार्दन येडगे, जितेंद्र पेंढारकर,आयेशा अत्तार, अतुल पाटील, गणेश माळी, रोहित पारिट, तनुजा पंडीत आदी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या :
१. महाज्योतीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या “महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) गेल्यावर्षीपर्यंत अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट उपलब्ध झाली
होती. तीच परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप उपलब्ध करावी.

२. पिचडीसाठी नोंदणी झालेल्या दिनांकापासून फेलोशिप अदा करण्यात यावी. आंदोलक: ओबीसी (OBC), विमुक्त जाती – भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग SBC समुदयातील संशोधक-पालक, महाज्योती कृती समिती

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button