आपला जिल्हा

भाविका झोरे मृत्यू प्रकरणातील गुन्ह्याचा पुणे शहर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घेतला आढावा ; खरी लोकजागृती न्यूज च्या बातमीची दखल

पुणे – भाविका झोरे या विवाहीतेचा ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सासच्या छळामुळे संशयास्पद मृत्यू झाला होता मृत्यूपुर्वी त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.या गुन्ह्यातील तपासाला गती यावी यासाठी पुणे शहर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे कैफीयत मांडली असता त्यांनी याप्रकरणाची तातडीने दखल घेत संबंधीत गुन्ह्याचा तातडीने आढावा घेत गुन्हाातील बाजू समोर आणली त्यांच्या कार्यतत्परतेचे नातेवाईकांनी कौतुक केले आहे.

भाविका मृत्यू प्रकरणी २० महीन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटून ही पोलिसांची तपास धीम्या गतीने सुरु होता या गुन्ह्यातील आवश्यक मुद्देमालासह दस्तावेज न्यायालयात सादर करणायास विलंब झाल्याची कैफीयत अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे मांडली होती तशा आशयाची बातमी खरी लोकजागृती न्यूज ने प्रकाशित केली होती. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या गुन्ह्याचा तातडीने आढावा घेत या विषयी आवश्यक दस्तावेज न्यायालयात सादर केल्याची माहीती यावेळी दिली आहे.

भाविका पिंगळे ही मुळची रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील रहीवासी असून तीचा १२ डिसेंबर २०१० रोजी विलास तुकाराम झोरे यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह करण्यात आला होता. लग्नानंतर फक्त ६ महीने संसार सुखी केल्यानंतर पतीकडून वारंवार अपमानास्पद वागणूक देण्याची सुरुवात झाली. भाविका न विलास यांना तीन मुले आहेत. भाविकाच्या आईने दिलेल्या तक्रारीतील माहीतीनुसार २०११ पासून भाविकाचा छळ होत होता. तीचा वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता. छळाबाबत भाविका हिने आईला फोनवरुन सांगितले होते. मात्र तिने या छळाबाबत घरच्या इतरांना न भावाला न सांगण्याची अट आई ला घातली होती. त्यामुळे आईने सांगितले नव्हते. भाविकाचा पती सुधारेल व छळाचं सुधारणा होईल अशी अपेक्षा तीच्या आईला होती मात्र तीच्या छळात वाढ होत गेली. भाविका ही वर्षातून एकदाच दिवाळी निमित्त माहेरी येत असे मात्र ती माहेरी आली की तीचा छळ वाढे अखेर तीचा या छळाने जीव घेतला आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला. भाविका हिच्या केस मध्ये गती येवून संबंधीत पुराव्यांच्या आधारे तातडीने कारवाई व्हावी अशी नातेवाईकांची मागणी आहे. त्यामुळेच रखडलेल्या तपासाला गती येण्यासाठी आता पुणे शहर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांना साकडे घातले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button