खेर्डीत कचरा संकनासाठी इलेक्ट्रीक घंडागाडी ; ओला व सुक्या कचऱ्याचे होणार वर्गीकरण

चिपळूण – तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर खेर्डी येथे गावातून सकंलीत केलेल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खताची निर्मीती केली जाते. ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण स्वतंत्रपणे होण्यासाठी ग्रामपंचायतीने इलेक्ट्रीक घंडागाडी घेतली आहे. त्याचे उदघाटन प्रभारी सरपंच विनोद भूरण यांच्याहस्ते व सदस्य आणि पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील कुटुंबाकडून कचरा संकलीत करून त्यावर सेंद्रीय खत निर्मीती करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. खेर्डी येथे दहा वर्षापुर्वीत तालुक्यात सर्वप्रथम सेद्रीय खत निर्मीतीचा प्रकल्प उभारण्यात आला. मध्यंतरी काही कारणास्तव हा प्रकल्प बंद होता. मात्र अलिकडे पुन्हा नव्या जोमाने तो सुरू करण्यात आला आहे. कचरा संकलनासाठी यापुर्वी ग्रामपंचायतीने दोन घंटा गाडी खरेदी केल्या आहेत. मात्र ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलीत होण्यासाठी तसेच इंधनबचतीसाठी इलेक्ट्रीक (बॅटरीवर चालणारी) घंटागाडी घेतली आहे. १५ वा वित्त आयोग निधीतून ती घेण्यात आली. प्रभारी सरपंच विनोद भूरण यांनी कचरा प्रकल्पाबाबत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, सरपंच विनोद भूरण, माजी सरपंच प्रकास पाथरूड, वृंदा दाते, अपर्णा दाते, सुनिल मेस्त्री, अजित खताते, माजी उपसरपंच बापू राऊत, ग्रामपंचायत सदस्य विजय शिर्के, अभिजीत खताते, सचिन मोहिते, वैशाली मोरे, सुप्रिया उतेकर, राकेश दाभोळकर, राजेश सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल लांजेकर,अरविंद कापडी, सतीश शिंदे, माजी तंटामक्ती अध्यक्ष अनिल फाळके, गावकर सुधाकर दाते, अजय जाधव, मनोहर शिगवण, ग्रामविकास अधिकारी विकास देसाई व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.



