आपला जिल्हा

शिवसेना ( शिंदे गट ) उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण सक्रीय ; नांदगाव ढमालवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

चिपळूण – शिवसेना उपनते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिपळूण तालुक्यातील नांदगाव ढमालवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यामध्ये नांदगाव ढमालवाडीचे मानकरी मधुकर ढमाल,अनंत मुंढेकर (अध्यक्ष-मिस्त्री),रविंद्र ढमाल,विनोद रामचंद्र शिंदे, शांताराम काणेकर,रामचंद्र रसाळ, अंकुश काणेकर,सुनिल गणपत काणेकर, शांताराम राजाराम मुंढेकर, मारुती काणेकर, शिवाजी गणपत शिंदे व सहकारी ग्रामस्थ यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ह्या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेनेत स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्थानिक विकासात्मक व संघटनात्मक चर्चा झाली. तसेच श्री. सदानंद चव्हाण यांनी शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा प्रवेशकर्त्यांना विश्वास दिला.

यावेळी तालुकाप्रमुख संदेश उर्फ बापू आयरे, उपतालुकाप्रमुख सिद्धार्थ कदम आणि उपतालुका संघटक अनिल उर्फ बावाशेठ रसाळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button