आपला जिल्हा
राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांचे डी.बी.जे महाविद्यालयातील विद्यार्थीनी ना मार्गदर्शन

चिपळूण – डी.बी.जे महाविद्यालयातील महिला विकास कक्ष अंतर्गत राबविलेल्या विविध प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रीत केले होते त्यांनी उपस्थित विद्यार्थींनींना प्रमाणपत्र देत कोर्स बद्दल मार्गदर्शन केले.
डि.बी.जे महाविद्यालयाच्या महीला विकास कक्षाच्या माध्यमातून मुलींना अनेक प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते यामध्ये शिवण,आर्टिफिशियल ज्वेलरी, ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग,मातीच्या कुंड्या बनविणे असे विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते त्या प्रसंगी विद्यार्थिनींना दिशा दाभोळकर यांनी मार्गदर्शन केले.



