आपला जिल्हा

कार्यकर्ता मेळाव्याचे उत्तम नियोजन केल्याबद्दल भास्कर जाधव यांची बंड्या बोरुकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!!

देवरुख – तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच बंड्या बोरुकर यांच्या नेतृत्वाखाली धामणी येथे उबाठा गटाचा मेळावा पार पडला.

या मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने आमदार भास्कर जाधव यानी तालुकाप्रमुख बोरुकर यांच्या उत्तम नियोजनाची प्रशंसा केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत संगमेश्वर चिपळुण मतदार संघात आपलाच आमदार असेल असा विश्वास भास्कर जाधव यानी व्यक्त केल्यावर ह्या मतदार संघातील सर्वाधिक मतदान सुद्धा संगमेश्वर तालुक्यामधून करू असे वचन तालुका प्रमुख बंड्या बोरुकर ह्यांनी दिले आहे.

या मेळाव्याला जिल्हाप्रमुख विलास चाळके; सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव; महिला जिल्हा प्रमुख वेदा फडके व सर्व विभाग प्रमुख; उपविभाग प्रमुख; शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button