राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन बैठक संपन्न ; भुखंडासह नागरी सुविधा कामे तातडीने मार्गी लावा संतोष येडगे यांच्या सूचना

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा कामे तातडीने मार्गी लावून येथील प्रकल्पग्रस्तांना त्यांचे भुखंड ताब्यात देण्यात यावेत यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काळंबेवाडी येथील नागरी सुविधा कामे तातडीने मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांचे भुखंड ताब्यात देण्याच्या सुचना संतोष येडगे यांनी या बैठकीत दिल्या या बैठकीला पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, उप अभियंता श्री.रणदिवे, शाखा अभियंता अभिजीत कदम, पांडूरंग येडगे, संतोष काळंबे, रवि काळंबे, आत्माराम काळंबे, तुकाराम मोरे, शांताराम मोरे, सिताराम गांगरकर आणि इतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
काळंबेवाडी पुनर्वस गावठाणातील कामांबाबत संतोष येडगे हे मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्त संतोष काळंबे, अनंत काळंबे यांनी या विषयी पुणे आणि गावाला अनेक बैठका घेत या विषयी पाठपुरावा केला आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात असून या विषयी पाटबंधारे विभागाने पुढाकार घेत कामाला गती दिली आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव हे काळंबेवाडी पुनर्वस संदर्भात सकारात्मक असून मे अखेर सर्व कामे संपवण्याचा निर्धार पाटबंधारे विभागाने केला आहे.
काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणात सर्वांना भुखंड देय शक्य नसल्याने गडनदी धरण क्षेत्राच्या दुर असलेल्या मोरे कुटुंबाचे स्वेच्छा पुनर्वस करावे असा प्रस्ताव स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागासमोर ठेवला असून धरण पाणी पातळीच्या १०० मीटर बाहेर त्यांच्या खाजगी जागेत स्वेच्छा पुनर्वसन करणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले असून येथील प्रकल्पग्रस्तांसाठी रस्ते, पाणी , वीज मिळावे म्हणून संतोष येडगे यांनी सूचना केली या प्रकल्पग्रस्तांसाठी दहा दिवसांत रस्त्यासाठी मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहीती कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांनी या बैठकीत दिली.
प्रकल्पग्रस्तांच्या गावठाण स्थलांतरासाठी शासन रोख स्वरुपातील अनुदानाची मदत करणार असून येथील प्रकल्पग्रस्तांनी आपले स्थलांतर तातडीने करावे अशा सूचना कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांनी बैठकीत केल्या
काळंबेवाडा गावठाणातील विज पुरवठा, गटारे, पाणी व्यवस्था आणि रस्ते आदी अपुर्ण असलेली कामे मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभाग कटीबद्द असून आता उर्वरीत कामांना सुरुवात करणार असल्याची माहीती कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांनी यावेळी दिली.कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील पंधरा दिवसांत आढावा बैठक घेणार असल्याचे श्री.जाधव यांनी यावेळी सांगितले.



